धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार ब्राह्मणांनाच, मोदी किंवा उमा भारतींना नाही : सी. पी. जोशी
काँग्रेसचे नेते सी.पी.जोशी यांच्या ब्राम्हणेतरांच्या वक्तव्यामुळे मला प्रचंड चीड आली. जोशींच्या वक्तव्यावर राहुल गांधींनी ट्विट करून सारवासारव केली आहे.
जोशी यांनीदेखील आपले वक्तव्य मागे घेतले.
https://goo.gl/drsMKc
परंतु घडलेला प्रकार दुर्दैवी आणि चीड आणणारा होता. काँग्रेस अशाप्रकारे धर्मनिरपेक्षतेच्या घोंगड्याखाली जातीचं राजकारण करत असेल तर पुढच्या निवडणुकांमध्येदेखील तोंडावर पडणार हे सांगायला कोणत्याही राजकीय तज्ञाची किंवा ज्योतिषाची गरज नाही.
परंतु घडलेला प्रकार दुर्दैवी आणि चीड आणणारा होता. काँग्रेस अशाप्रकारे धर्मनिरपेक्षतेच्या घोंगड्याखाली जातीचं राजकारण करत असेल तर पुढच्या निवडणुकांमध्येदेखील तोंडावर पडणार हे सांगायला कोणत्याही राजकीय तज्ञाची किंवा ज्योतिषाची गरज नाही.
खरंतर ब्राम्हण, ब्राम्हणेतर सर्वांनी मिळूनच हिंदू धर्म तयार होतो. तो कोणत्याही एका जातीचा किंवा पंथाचा नाही. पण अशी वक्तव्ये करून भाजपच्या हिंदू मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार करणे हाच हेतू दिसून आला, पण काँग्रेससाठी अशी वक्तव्ये बुमरँगच ठरतात, हा गेल्या काही वर्षातला इतिहास आहे.
एक आठवण सांगतो...आमचं कुटुंब उरुळी कांचनला स्थिरस्थावर होण्याआधी माझे खापर पणजोबा मेमाणवाडी या उरुळीशेजारील गावात रहात असत. तिथे आमची १५ एकर शेती होती. गाव अतिशय लहान होतं. आम्ही ब्राम्हण नव्हतो तरीही गावात आमचं कुटुंब थोडंफार शिकलेलं होतं धार्मिक वृत्तीचं होतं, त्यामुळे गावातले आणि पंचक्रोशीतले लोक पंचांग बघण्यासाठी, मुहूर्त काढण्यासाठी, धार्मिक बाबींवर सल्लामसलती आणि मार्गदर्शनासाठी माझ्या खापर पणजोबांकडे येत असत. कारण गावात ब्राम्हणच नव्हता. यावर कुुणीही, कधीही आक्षेप नोंदवला नाही. हे एक उदाहरण झालं! पण अशा कितीतरी गाव खेड्यात, जिथे ब्राम्हण उपलब्ध होत नसे तिथे अशाच पद्धतीने आपल्याकडे अघोषितपणे पर्यायी व्यवस्था तयार झालेली आहे. हिंदू धर्मात अशी कोणतीही गोष्ट अमान्य नाही, आपल्या देवांना सर्वकाही चालतं. अनेक हिंदु मंदिरांमध्ये ब्राम्हणेतर पुजारी आहे ही गोष्टदेखील आपल्याला नवीन नाही. त्याचवेळी अनेक ब्राम्हण पौरोहित्य करत नाहीत किंबहुना त्यांना त्यात रसदेखील असत नाही ही फॅक्ट आहे. भगवान परशुराम सोडले तर बहुतेक सर्व देवता ब्राम्हणेतरच आहेत, अगदी प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्णदेखील ब्राम्हणेतरच. माझ्या मते हिंदू धर्म हा फक्त ब्राम्हणांचा कधीच असू शकत नाही तो सर्वच जातींचा, पंथाचा समान आहे..
पूर्वी ब्राम्हणाला गावात महत्त्व असायचं याचं एक मुख्य कारण म्हणजे तो शिकलेला असायचा. पण ब्राम्हणवर्ग संख्येने कमी असायचा. आताही ग्रामीण भागात बोटावर मोजण्याइतकी ब्राम्हणांची संख्या दिसून येते. पण त्याचवेळी शिक्षणाचा प्रसार झाल्याने अगदीच ग्रामीण भागातदेखील किमान काही लोक सुशिक्षित असतात. त्यांना ग्रामीण भागात तोच मान मिळतो जो पूर्वी ब्राम्हणाला मिळायचा. उदा. खेडेगावात शिकवणारा शिक्षक घ्या, त्याला मिळणारा आदर कुठेही ब्राम्हणाला मिळणाऱ्या आदरापेक्षा कमी असत नाही, भले कागदावर जात काहीही असो. म्हणजेच लोक जातीला आदर न देता, लोक शिक्षणाला आदर देत असतात ही फॅक्ट आहे.
अशा केसमध्ये फक्त ब्राम्हणांना हिंदू धर्म कळतो म्हणून ब्राम्हण आणि ब्राम्हणेतरांच्यामध्ये भांडणे लावून द्यायची आणि राजकीय फायदा उचलायचा असा घाणेरडा खेळ टुकार राजकीय नेत्यांनी खेळायला सुरुवात केली आहे. मोदी विरोधाच्या फुग्याला टाचणी लागेल म्हणून ही गोष्ट अनेकांना पटलेली नसली तरीही यावर कुणीही आक्षेप नोंदवणार नाही...दुर्दैव!!!



No comments:
Post a Comment