Wednesday, November 28, 2018

नंदिनी सुंदर आणि सुकमा प्रकरण

आज नंदिनी सुंदर यांची बातमी वाचण्यात आली. सुप्रीम कोर्टाने छत्तीसगढ सरकारला नंदिनी सुंदर यांच्याविरुद्ध असलेल्या केसबाबत अहवाल मागवला. काय केस आहे म्हणून अधिक शोध घेतल्यावर पायाखालची जमीन सरकली. [आत्तापर्यंतची पूर्ण केस : Quint - https://goo.gl/VHkq5q]

Nandini sundar controversies : असं गुगल केल्यावर तुम्हाला हिंदू, हिंदुस्तान टाईम्स, फर्स्ट पोस्ट असे बरेच संदर्भ मिळतात.

त्यातली पहिली बातमी : DU professor Nandini Sundar booked for tribal man’s murder

बातमीचा दुवा : https://goo.gl/edvypL

तारीख - ८ नोव्हेंबर २०१६ - रायपुर

सविस्तर : दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापिका नंदिनी सुंदर यांना इतर माओवाद्यांसोबत एका आदिवासी व्यक्तीच्या खुनाच्या गुन्ह्यात नक्षलग्रस्त छत्तीसगढ-सुखमा इथे अटक केली गेली. नंदिनी सुंदर (दिल्ली युनिव्हर्सिटी), अर्चना प्रसाद (जेएनयु), संजय पराटे (छत्तीसगढ सीपीआय-मार्क्सवादी, राज्य सचिव), विनीत तिवारी(दिल्ली जोशी संस्थान), यांच्यावर बाघेल नावाच्या व्यक्तीच्या खुनासाठी मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केली गेली. 

इंडियन पिनल कोडच्या १२० बी, ३०२, १४७, १४८, १४९ या कलमाअंतर्गत टोंगपाल पोलीस स्टेशनमध्ये त्यांना अटक झाली होती. आरोपानुसार नक्षलवाद्यांनी श्यामनाथ बाघेल याचा धारदार शस्त्राने वार करून खून केला!

कारण - बाघेल आणि त्याचे काही साथीदार नक्षलवाद्यांच्या विरोधात उभे राहिले होते.

बाघेलच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, नंदिनी सुंदर यांच्याविरुद्ध तक्रार केल्याने तिच्या नवऱ्याला माओवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. गावकऱ्यांच्यामते नंदिनी सुंदर आणि त्यांचे सहकारी या आदिवासींना सरकारविरोधात भडकवत होते आणि माओवाद्यांना समर्थन देण्यासाठी दबाव आणत होते. नंदिनी सुंदर यांनी त्या गावात जाताना रीचा केशव हे फेक नाव घेतल्याचा उल्लेखदेखील या बातमीत केला गेला आहे. यावर अजून एक सविस्तर बातमी आहे (Nandini Sundar used fake name in Chhattisgarh, faces strict action: Top cop https://goo.gl/c5yXp3)

~~~~~~~~~~~~~~~~~~~

हे सर्व धक्कादायक आहे. एका गोष्टीचं मात्र दुःख वाटलं, मराठी मिडीयाने या प्रकरणाची कधीच दखल घेतलेली दिसली नाही, ना यावर कधी चर्चा झाली. नंदिनी सुंदर नाव माझ्यासाठी तसं नवीन नव्हतं, परंतु अशा प्रकरणात ही व्यक्ती अडकलेली आहे, हे मात्र प्रथमच समोर आलं.

Tuesday, November 27, 2018

भाजप Top Advertiser नाही

४-५ दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झाली. टॉप टेन ऍडव्हरटायझर्स मध्ये भाजपचं नाव होतं. अशा केसमध्ये त्या इमेजमध्ये जो सोर्स दिलाय तिथे जाऊन एकदा खरे/खोटे/चुकीचे हे चेक करणे गरजेचे आहे. पूर्ण पडताळणी केल्याशिवाय चांगलं, वाईट मत बनवायचं नाही आणि अशा बातम्यांना दुजोरादेखील द्यायचा नाही हे तत्त्व आपण पाळायला हवे.


बार्कने १०-१६ नोव्हेंबरची आकडेवारी म्हणून त्यांच्या संकेतस्थळावर २ तक्ते प्रसिद्ध केले आहेत. टॉप टेन ऍडव्हरटायझर आणि टॉप टेन brands. ऍडव्हरटाइजर मध्ये उद्योग समूहाची नावे आहेत. ती खालीलप्रमाणे. यात कुठेही भाजपचा उल्लेख नाही. म्हणजेच ज्यांनी ऍडव्हरटाइजर म्हणून भाजपच नाव घातलंय त्यांनी गंभीर चूक केलेली आहे.



ऍडव्हरटाईजर म्हणून भाजपचं नाव पुढे केलं गेलं जे चूक आहे. फेक न्यूजचा प्रकार. पण त्याचवेळी जाहिराती केलेल्या brandमध्ये भाजप अव्वल आहे, हे कसं बुवा? यासाठी मी बार्कला ईमेल लिहिली... त्यांनी दिलेले उत्तर स्क्रीनशॉटमध्ये दिले आहे.


साध्या शब्दात :
उद्योगसमूह अबक - १० रु लावले त्यात ५ ब्रँडच्या जाहिराती. प्रत्येक brand ला २ रुपये मिळाले. म्हणजे एका उत्पादनाच्या वाट्याला येतात २ रु.
भाजप - ५ रु लावले त्यात एकाच ब्रँडची/उत्पादनाची जाहिरात. त्यामुळे २ रुपयांच्या तुलनेत ५ रुपयांत जाहिरात जास्तच होणार.

Saturday, November 24, 2018

हिंदू धर्म सर्वांचाच

धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार ब्राह्मणांनाच, मोदी किंवा उमा भारतींना नाही : सी. पी. जोशी

काँग्रेसचे नेते सी.पी.जोशी यांच्या ब्राम्हणेतरांच्या वक्तव्यामुळे मला प्रचंड चीड आली. जोशींच्या वक्तव्यावर राहुल गांधींनी ट्विट करून सारवासारव केली आहे.
जोशी यांनीदेखील आपले वक्तव्य मागे घेतले.
https://goo.gl/drsMKc


परंतु घडलेला प्रकार दुर्दैवी आणि चीड आणणारा होता. काँग्रेस अशाप्रकारे धर्मनिरपेक्षतेच्या घोंगड्याखाली जातीचं राजकारण करत असेल तर पुढच्या निवडणुकांमध्येदेखील तोंडावर पडणार हे सांगायला कोणत्याही राजकीय तज्ञाची किंवा ज्योतिषाची गरज नाही.

खरंतर ब्राम्हण, ब्राम्हणेतर सर्वांनी मिळूनच हिंदू धर्म तयार होतो. तो कोणत्याही एका जातीचा किंवा पंथाचा नाही. पण अशी वक्तव्ये करून भाजपच्या हिंदू मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार करणे हाच हेतू दिसून आला, पण काँग्रेससाठी अशी वक्तव्ये बुमरँगच ठरतात, हा गेल्या काही वर्षातला इतिहास आहे.

एक आठवण सांगतो...आमचं कुटुंब उरुळी कांचनला स्थिरस्थावर होण्याआधी माझे खापर पणजोबा मेमाणवाडी या उरुळीशेजारील गावात रहात असत. तिथे आमची १५ एकर शेती होती. गाव अतिशय लहान होतं. आम्ही ब्राम्हण नव्हतो तरीही गावात आमचं कुटुंब थोडंफार शिकलेलं होतं धार्मिक वृत्तीचं होतं, त्यामुळे गावातले आणि पंचक्रोशीतले लोक पंचांग बघण्यासाठी, मुहूर्त काढण्यासाठी, धार्मिक बाबींवर सल्लामसलती आणि मार्गदर्शनासाठी माझ्या खापर पणजोबांकडे येत असत. कारण गावात ब्राम्हणच नव्हता. यावर कुुणीही, कधीही आक्षेप नोंदवला नाही. हे एक उदाहरण झालं! पण अशा कितीतरी गाव खेड्यात, जिथे ब्राम्हण उपलब्ध होत नसे तिथे अशाच पद्धतीने आपल्याकडे अघोषितपणे पर्यायी व्यवस्था तयार झालेली आहे. हिंदू धर्मात अशी कोणतीही गोष्ट अमान्य नाही, आपल्या देवांना सर्वकाही चालतं. अनेक हिंदु मंदिरांमध्ये ब्राम्हणेतर पुजारी आहे ही गोष्टदेखील आपल्याला नवीन नाही. त्याचवेळी अनेक ब्राम्हण पौरोहित्य करत नाहीत किंबहुना त्यांना त्यात रसदेखील असत नाही ही फॅक्ट आहे. भगवान परशुराम सोडले तर बहुतेक सर्व देवता ब्राम्हणेतरच आहेत, अगदी प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्णदेखील ब्राम्हणेतरच. माझ्या मते हिंदू धर्म हा फक्त ब्राम्हणांचा कधीच असू शकत नाही तो सर्वच जातींचा, पंथाचा समान आहे..

पूर्वी ब्राम्हणाला गावात महत्त्व असायचं याचं एक मुख्य कारण म्हणजे तो शिकलेला असायचा. पण ब्राम्हणवर्ग संख्येने कमी असायचा. आताही ग्रामीण भागात बोटावर मोजण्याइतकी ब्राम्हणांची संख्या दिसून येते. पण त्याचवेळी शिक्षणाचा प्रसार झाल्याने अगदीच ग्रामीण भागातदेखील किमान काही लोक सुशिक्षित असतात. त्यांना ग्रामीण भागात तोच मान मिळतो जो पूर्वी ब्राम्हणाला मिळायचा. उदा. खेडेगावात शिकवणारा शिक्षक घ्या, त्याला मिळणारा आदर कुठेही ब्राम्हणाला मिळणाऱ्या आदरापेक्षा कमी असत नाही, भले कागदावर जात काहीही असो. म्हणजेच लोक जातीला आदर न देता, लोक शिक्षणाला आदर देत असतात ही फॅक्ट आहे.

अशा केसमध्ये फक्त ब्राम्हणांना हिंदू धर्म कळतो म्हणून ब्राम्हण आणि ब्राम्हणेतरांच्यामध्ये भांडणे लावून द्यायची आणि राजकीय फायदा उचलायचा असा घाणेरडा खेळ टुकार राजकीय नेत्यांनी खेळायला सुरुवात केली आहे. मोदी विरोधाच्या फुग्याला टाचणी लागेल म्हणून ही गोष्ट अनेकांना पटलेली नसली तरीही यावर कुणीही आक्षेप नोंदवणार नाही...दुर्दैव!!!